जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ८६ टक्क्यावर

    दिनांक : 01-Oct-2020
Total Views |
जिल्ह्यात ३०३ नवे रुग्ण तर ९०९ रुग्ण कोरोनामुक्त; ६ जणांचा मृत्यू

dfnk_1  H x W:  
 
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याच्या प्रमाणाला गेल्या काही दिवसांपासून ब्रेक लागला आहे. त्यामानाने बरे होणार्‍यांची संख्यादेखील वाढू लागली आहे. मात्र गुरुवारी कोरोनाच्या रुग्णात काही प्रमाणात वाढ झाली असून दिवसभरात ३०३ नवे रुग्ण आढळून आले असून ९०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे जिल्ह्याचा रिकव्हरी रेट हा ८५.५० टक्क्यांवर आला असल्याने ही जळगावकरांसाठी समाधानाची बाब ठरत आहे.
 
राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम आहे. दिवसागणिक कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असल्याचे सर्वांच्या चिंतेत भर पडली होती. परंंतु गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील बाधितांचा आकडा काही प्रमाणात मंदावला असून बाधितांपेक्षा पेक्षा बरे होणार्‍यांची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यात कोरोनाचे ३०३ नवे रूग्ण आढळून आले तर ९०९ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तसेच आतापर्यंत बाधितांची संख्या ही ४८ हजार ४८४ इतकी तर त्यापैकी ४१ हजार ४५४ जण बरे झाली असून १ हजार १९० जणांचा मृत्यू झाला आहे तर ५ हजार ८४० जणांवर सध्य उपचार सुरु आहे.
 
असे आढळले रुग्ण
गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यात ३०३ नवे रुग्ण आढळले. यामध्ये जळगाव शहर ६७, जळगाव ग्रामीण ८, भुसावळ ३०, अमळनेर २८, चोपडा ५२, पाचोरा ६, भडगाव २, धरणगाव ५, यावल ६, एरंडोल ८, जामनेर २९, रावेर ९, पारोळा २, चाळीसगाव २९, मुक्ताईनगर ६, बोदवड ७ तर अन्य जिल्ह्यातील १० जणांचा समावेश आहे. गुरुवारी दिवसभरात ६ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये भुसावळ तालुक्यातील ३ तर जळगाव, अमळनेर, व यावल तालुक्यतील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.