पुलवामा हल्ल्यानंतर काश्मिरी तरुणांनी घेतले देशसेवेचे व्रत
स्रोत: Tarun Bharat Jalgaon   दिनांक :20-Feb-2019

लष्करातील १११ जागांसाठी २५०० तरुणांनी केला अर्ज

 

 
 
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये परिस्थिती बदलताना दिसत आहे. काश्मीरमधील बारामुल्ला येथे भारतीय लष्कराच्या १११ जागांसाठी भरती सुरु केली आहे. लष्कराच्या भरतीला काश्मिरी तरुण चांगला प्रतिसाद देत आहेत.
 
भारतीय लष्करातील १११ जागांसाठी तब्बल २५०० काश्मिरी तरुणांनी अर्ज केला आहे. लष्करात भरती होऊन देशसेवा करण्याची इच्छा या काश्मिरी तरुणांनी व्यक्त केली. पुलवामा हल्ल्यानंतर काश्मिरी तरुणांनी लष्करात भरती होण्याचा निर्णय घेतला. दहशतवाद नष्ट करण्यासाठी काश्मिरी तरुणांनी पुढाकार घेत हे पाऊल उचलल्याचे दिसत आहे.
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...https://www.facebook.com/Tarunbharatjal/