न्यूयॉर्कमध्ये साजरी झाली शिवजयंती
स्रोत: Tarun Bharat Jalgaon   दिनांक :19-Feb-2019
 

 
 

दिग्दर्शक व अभिनेते नागराज मंजुळे यांची प्रमुख उपस्थिती

न्यूयॉर्क : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यातच नव्हे तर जगभरात प्रचंड उत्साहात साजरी होत आहे. न्यूयार्कमध्येही हाच जोश पाहायला मिळाला. न्यूयार्कमधील भारताचे वाणिज्य दूतावास आणि अल्बानी ढोल ताशा पथक व छत्रपती फाऊंडेशनतर्फे शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिग्दर्शक व अभिनेते नागराज मंजुळे, न्यूयॉर्क स्टेट सिनेटर केव्हिन थॉमस, पश्चिम विंडसर भागाचे महापौर हेमंत मराठे, उप-राजदूत शत्रुघ्न सिन्हा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होेते.
 
 
न्यूयार्क येथील कार्यक्रमातील एक फोटो नागराज मंजुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेला एक तरुण असून त्यांच्यासोबतच फोटो नागराज यांनी शेअर केला आहे. त्यांनी याला "असा सेल्फी काढण्याचा मोह कधीतरीच होतो" असे कॅप्शन दिले आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३८९व्या जयंती निमित्त आयोजित या कार्यक्रमात कलाकारांनी शिवजन्म, शिवराज्यभिषेक, लेझीम, पोवाडा असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.