हिंदू महाग्रंथांमधून मिळाली मानसिक शांती; जलतरणपटू मिसी फ्रॅंकलिन यांचे मत
स्रोत: Tarun Bharat Jalgaon   दिनांक :19-Feb-2019
 

 
 
मोनॅको : हिंदू धर्मग्रंथ वाचल्याने मला मानसिक शांती मिळते, असे मत ऑलम्पिकमध्ये पाच सुवर्णपदके कमावणाऱ्या अमेरिकन-कॅनेडियन जलतरणपटू मिसी फ्रॅंकलिन यांनी व्यक्त केले आहे. वयाच्या तेवीसाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरातून निवृत्ती घेतलेल्या मिसीला खांदेदुखीचा त्रास होत होता. त्यामुळे योगासने शिकण्यास सुरुवात केली. यावेळी हिंदू धर्माबद्दल कुतूहल निर्माण झाल्याने जॉर्जिया विश्वविद्यालयातून धर्माचा अभ्यास सुरू केला.
 

 
 
सोमवार, दि. १८ फेब्रुवारी रोजी मोनॅको येथे झालेल्या लॉरेस जागतिक क्रीडा पुरस्काराच्या कार्यक्रमानिमित्त मिसी बोलत होत्या. “मी गेली वर्षभर धर्मांचा अभ्यास करत आहे. हा अभ्यास मला आकर्षित करणार आहे. विविध संस्कृती आणि धार्मिक मान्यतांविषयी माहिती मला यातून मिळत गेली आहे.”
 
 
 
ख्रिश्चन धर्मापेक्षा मी हिंदू आणि मुस्लीम धर्माबाबत माझी रूची जास्त आहे. या दोन्ही धर्मांविषयी मला माहिती नव्हती मात्र, अभ्यासादरम्यान यात नवनव्या गोष्टींची माहिती मिळत गेली. रामायण आणि महाभारत हे दोन्ही महाग्रंथ मी वाचत असल्याचे मत त्यांनी सांगितले.
 

 
 
त्या म्हणाल्या, “मला पुराणातील गोष्टी वाचायला आवडतात. देवाबद्दल जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. रामायण आणि महाभारत वाचण्याचा अनुभव अद्भूत आहे. महाभारतातील परिवारांबद्दल आणि नावांबद्दल मला अजूनही संभ्रम आहे. पण रामायणातील राम आणि सिता ही पात्रे मला चांगलीच लक्षात राहीली आहेत.”