शिवाजी महाराजांसारखा राजा होणे नाही : पंतप्रधान मोदी
स्रोत: Tarun Bharat Jalgaon   दिनांक :19-Feb-2019
 

 
 
नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी शिवरायांना विनम्र अभिवादन केले. “जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण आहे. शिवाजी महाराज हे एक बहुआयामी व्यक्ती होते. सततच्या लढाया लढून, संघर्ष करूनही शिवाजी महाराजांनी सुशासन कायम ठेवले.” असे म्हणत पंतप्रधान मोदींनी शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी एक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे.
 
 
 
श्रीरामाच्या वानरसेनेचा दाखला देत पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांची स्तुती केली. “प्रभू श्रीरामचंद्रांनी ज्याप्रमाणे वानरांना एकत्रित आणून वानरसेना स्थापन केली आणि विजय मिळवला. त्याचप्राणे शिवाजी महाराजांनी आपले संघटन कौशल्य वापरून शेतकरी आणि मावळ्यांना संघटित केले. त्यांना युद्धासाठी तयार केले.” असे पंतप्रधान मोदींनी म्हटले.
आज शिवजयंतीनिमित्त देशभरातून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले जात आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोशल मीडियासारख्या विविध माध्यमाद्वारे शिवरायांना मानवंदना दिली जात आहे.