युती झाली; लोकसभेत भाजपला २५ शिवसेना २३ जागा
स्रोत: Tarun Bharat Jalgaon   दिनांक :19-Feb-2019
 
 
 
मुंबई : शिवसेना भाजप विधानसभा आणि लोकसभा निवडणूका एकत्र लढवणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केले. लोकसभेत शिवसेना २३ तर भाजप २५ जागा लढवेल तर विधानसभेसाठी ५०-५० हा फॉर्म्युला ठरल्याचेही त्यांनी जाहीर झाले.
 
 
 
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप युतीच्या चर्चेसाठी भाजप अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. शिवसेना भाजपतर्फे युतीच्या घोषणेसाठी मुंबईतील एका हॉटेलमध्ये संयुक्तपत्रकार परिषद घेण्यात आली. मुंबई ठाण्यातील पाचशे चौरस फुटांच्या घरांना करमाफी करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. नाणार प्रकल्पासाठी स्थानिकांना विश्वासात घेणार असल्याचेही ते म्हणाले. ग्रामस्थांची मान्यता नसेल तर प्रकल्पाची जागा बदलण्यात ययेमार आहे.
 
 
यावेळी भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री पियुष गोयल, प्रकाश जावडेकर आणि रावसाहेब दानवे, पूनम महाजन, पंकजा मुंडे आदींसह प्रमुख नेते उपस्थित होते. शिवसेनेतर्फे अनंत गीते, आदेश बांदेकर आणि अन्य नेते मंडळी उपस्थित होते.