@@INCLUDE-HTTPS-REDIRECT-METATAG@@ ‘जिवंतपणी’च केले उत्तरकार्य

‘जिवंतपणी’च केले उत्तरकार्य

 
 
जळगाव, १८ फेब्रुवारी
हिंदूच्या जीवनात आध्यात्माचा प्रभाव आहे. परलोकाची आस त्यातूनच लागून असते. कर्मकांडाचा प्रभाव असल्याने मृत्यूनंतर १३ व्या दिवशी उत्तरकार्य करण्याची परंपरा आहे. हिंदू धर्मात संन्यासी संन्यास घेतानाच त्यांचे उत्तरकार्य उरकून घेत असतात. परंतु ज्यांच्या पश्‍चात वारस नाही, अशांना त्यांच्या उत्तरकार्याची चिंता सतावत असते.धरणगाव तालुक्यातील चांदसर येथील जमुनाबाई चिंधू चौधरी (६५) या महिलेने जिवंतपणीच उत्तरकार्याचे सर्व सोपस्कार पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. जमुनाबाई या अविवाहित आहेत. त्यांना भाऊ आहे. तरीसुद्धा त्यांनी हा निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयास सुरेश चौधरी, सुधाकर चौधरी, दामू चौधरी, भूषण चौधरी, सुपडू सोनवणे, मच्छिंंद्र कोळी, संजय चौधरी, पंकज चौधरी यांनी सहकार्य केले.