कुलभूषण जाधव प्रकरण : आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकिस्तानचा बुरखा फाडला
स्रोत: Tarun Bharat Jalgaon   दिनांक :18-Feb-2019
 
 
 
द हेग : कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. यावेळी भारताने पाकिस्तानला चोहोबाजूंनी घेराव घातला. भारतातर्फे अॅड. हरिश साळवे आणि अॅड. दीपक मित्तल यांनी पाकिस्तानचा पर्दाफार्श केला.
 
 
 
हरिश साळवे यांनी केलेल्या आरोपांनुसार, “पाकिस्तानने वारंवार वियना संधी उल्लंघन केले आहे. १३ वेळा विनंती केल्यानंतरही परवानगी नाकारली होती. कुलभूषण जाधव हे निर्दोष असतानाही पाकिस्तान आपल्या दुष्प्रचार सुरूच ठेवला आहे.”
 
 
हरि साळवे यांनी पाकिस्तानला उघडे पाडले. वियना संधीबाबत साळवे यांनी विविध नियमांवर बोट ठेवून पाकिस्तान त्याच्या शेजारील राष्ट्रातील नागरिकांची हत्या करत असल्याचे सांगितले आहे. यापूर्वी दीपक मित्तल यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयाला निर्देशित करताना सांगितले कि, “कुलभूषण जाधव प्रकरणामुळे आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाबद्दल भारतातील सव्वाशे कोटी नागरिकांच्या सद्भावना आहेत. पाकिस्तानने निर्दोषी भारतीयांच्या अधिकार डावलले आहेत.”
 
पाकिस्तान दुष्प्रचारासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा वापर करत असल्याचेही साळवे यांनी सांगितले. पाकिस्तान यावर १९ फेब्रुवारीला बाजू मांडणार आहे. यावर २० फेब्रुवारीला भारताकडून उत्तर देण्यात येईल. या प्रकरणी आगामी काही महिन्यात आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय येण्याची शक्यता आहे.
 
कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी लष्कराने मार्च २०१६ मध्ये तथाकथित हेरगिरीच्या आरोपावरून पकडले. तसेच, कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेशिवाय परस्पर फाशीची शिक्षा सुनावली होती. भारताने या प्रकरणी पाकिस्तानची एकतर्फी भूमिका तसेच, कारवाई करण्यावरून आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका दाखल करत स्थगिती आणली होती.