पुलवामामध्ये दहशतवाद्यांशी चकमक, सुरक्षा दलाचे चार जवान शहीद
स्रोत: Tarun Bharat Jalgaon   दिनांक :18-Feb-2019
 
 
 
पिंगलान : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याची घटना ताजी असताना सोमवारी पहाटे पुलवामा येथील पिंगलान येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीदरम्यान सुरक्षा दलाचे चार जवान शहीद झाले आहेत. या चार जवानांमध्ये एका मेजरचाही समावेश आहे.
 
 
पुलवामामधील पिंगलान येथे काही दहशतवादी लपून बसले होते. अशी महिती सुरक्षा दलाला मिळाली होती. सोमवारी पहाटे सुरक्षा दलाने या भागात दहशतवाद्यांचा शोध घेतला. यादरम्यान, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. या गोळीबारात पाच जवान जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान यातील चार जवानांचा शहीद झाले. एक जवान अजून जखमी अवस्थेत आहे. मेजर डी. एस. डोंडियाल, हेड कॉन्स्टेबल सेवा राम, शिपाई अजय कुमार, शिपाई - हरी सिंग ही या चकमकीदरम्यान शहीद झालेल्या जवानांची नावे आहेत.
 
सुरक्षा दलातील शहीद झालेल्या या चार जवानांमध्ये एका मेजरचा समावेश आहे. सुरक्षा दलाने दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरले आहे. या भागात अजूनही सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यामध्ये चकमक सुरु आहे. या दहशतवाद्यांचा पुलवामा हल्ल्याशी संबंध आहे का याविषयी अद्याप काही माहिती मिळू शकलेली नसली तरी हे दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सुरक्षा दल आणि या दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीदरम्यान एक स्थानिक नागरिक जखमी झाला असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, पुलवामा जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात असून हिंजवडी येथील आयटी हबला अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. तेथील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.