@@INCLUDE-HTTPS-REDIRECT-METATAG@@ लष्कराची मोठी कारवाई, जैशच्या कमांडरला कंठस्नान

लष्कराची मोठी कारवाई, जैशच्या कमांडरला कंठस्नान

दहशतवादी लपलेले घर लष्कराकडून उध्वस्त.. लष्कराची मोठी कारवाई

 
 
पिंगलान : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील पिंगलाम येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सोमवारी पहाटेपासून चकमक सुरु होती. जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश मिळाले आहे. जैश-ए- मोहम्मदचा कमांडर कामरान आणि सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड गाझी राशीद या दोघांना सुरक्षा दलाने कंठस्नान घातले. अशी माहिती मिळाली आहे.
 
 
सुरक्षा दलाकडून अजून यावृत्ताला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. सुरक्षा दलाने पिंगलानमध्ये दहशतवादी लपून बसलेले घर स्फोटकांनी उडवले. लष्कराने कारवाई करत या दोन दहशतवाद्यांना ठार केले. सोमवारी पहाटे या भागात झालेल्या चकमकीदरम्यान, सुरक्षा दलाचे चार जवान शहीद झाले होते. या घटनेला प्रत्युत्तर देत सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांना खात्मा केला.