@@INCLUDE-HTTPS-REDIRECT-METATAG@@ भाजपातर्फे धरणे आंदोलन, शहिदांना भावपूर्ण श्रध्दांजली

भाजपातर्फे धरणे आंदोलन, शहिदांना भावपूर्ण श्रध्दांजली

 
 
 
जळगाव, १७ फेब्रुवारी
पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात जवान शहीद झाले. या हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरात संतापाची लाट पसरली असून, जळगाव जिल्हा भाजपा महानगरतर्फे रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
 
 
‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘शहीद जवान अमर रहे’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. आंदोलनप्रसंगी डॉ. गुरूमुख जगवाणी, महापौर सीमा भोळे, उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, मनपा स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे, मनपा गटनेते भगत बालाणी, जि. प. सभापती प्रभाकर सोनवणे, मनपा महिला व बालकल्याण समिती सभापती मंगला चौधरी, नगरसेवक कैलास सोनवणे, आबा कापसे, जिल्हा पदाधिकारी विशाल त्रिपाठी, दीपक सूर्यवंशी, महेश जोशी, सुभाष शौचे, नितीन इंगळे, बापू ठाकरे, शरिफा तडवी, सरिता नेरकर, उज्ज्वला बेंडाळे, ज्योती चव्हाण, वंदना पाटील, मनोज भांडारकर, दत्तात्रय जाधव, मंडल अध्यक्ष धीरज सोनवणे, राजेंद्र मराठे, महेश चौधरी, डॉ. विश्वनाथ खडके, ऍड. शुचिता हाडा, सुनील माळी, गणेश माळी, आघाड्यांचे अध्यक्ष इरफान नुरी, युसूफ खान, महादेव सोनवणे, ज्योती राजपूत, जयश्री पाटील, किर्ती चौबे, मेहबूब बागवान यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.