@@INCLUDE-HTTPS-REDIRECT-METATAG@@ गोलाणी मोबाईल चोरी प्रकरणातील मोबाईलसह संशयित ताब्यात

गोलाणी मोबाईल चोरी प्रकरणातील मोबाईलसह संशयित ताब्यात

 

 
 
जळगाव, १३ फेब्रुवारी
शहरातील गोलाणी व्यापार संकुलात ११ फेब्रुवारीच्या रात्री ८.३० ते १२ च्या सकाळी ५ वाजेदरम्यान माऊली मोबाईल या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून अज्ञात इसमाने दुकानातून १ लाख ६५ हजार ४०० रुपये किमतीचे १३ मोबाईल चोरून नेल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
 
 
या गुन्ह्यात मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमधील अज्ञात इसमाचा शोध घेत असताना शहर पो.स्टे.चे पोउनि राजकुमार हिंगोले, पो.हे.कॉ. विजयसिंग पाटील, पो.ना. विकास महाजन, प्रितम पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सहा फौ. वासुदेव सोनवणे, पो.हे.कॉ. सुनील पाटील यांच्यासह डोमगाव, ता. जळगाव येथे जाऊन शेतात आरोपी स्वप्निल ज्ञानेश्‍वर पाटील (रा. बिलवाडी ता. जळगाव) याच्याकडून गुन्ह्यात चोरलेले १ लाख ६५ हजार ४०० रुपये किमतीचे मोबाईल मिळून आले आहे. पुढील तपास पो.उ.नि. राजकुमार हिंगोले व पो.ना. महाजन करत आहेत.