@@INCLUDE-HTTPS-REDIRECT-METATAG@@ रघुवंशी विद्यामंदिरात विज्ञान प्रदर्शन, विद्यार्थ्यांकडून ३८ उपकरणे सादर

रघुवंशी विद्यामंदिरात विज्ञान प्रदर्शन, विद्यार्थ्यांकडून ३८ उपकरणे सादर

 
नंदुरबार :
येथील कै. मोहनसिंग कन्हैयालाल रघुवंशी प्राथमिक विद्या मंदिरात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी ३८ उपकरणे सादर केली.
 
 
प्रदर्शनाचे उद्घाटन नंदुरबार पं.स. गटशिक्षणाधिकारी डॉ.सी.के.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हूणन नगरसेवक राकेश खलाणे, शिक्षक-शिक्षकेतर संघटनेचे जिल्हाध्यक्ष रुपेय चौधरी, रोटरी क्लब नंदनगरीचे अध्यक्ष शब्बीर मेमन, माजी मुख्याध्यापक सुरेश माळी, प्रितीष बांगड आदी उपस्थित होते.
 
 
मान्यवरांनी उपकरणाचे परीक्षण करून विद्यार्थ्यांना त्यावर आधारित प्रश्न विचारली. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन मुख्याध्यापक मनोज गायकवाड यांनी तर सूत्रसंचालन दिनकर सावळे यांनी केले. यशस्वितेसाठी वसुमती नेरे, वैशाली पाडवी, अकील शेख, शुभांगी माळी, यशवंत बोरसे, राहुल झाल्टे, अनिल गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.