@@INCLUDE-HTTPS-REDIRECT-METATAG@@ भुसावळ न.प.च्या सभेत १५ मिनिटात १५ विषय मंजूर

भुसावळ न.प.च्या सभेत १५ मिनिटात १५ विषय मंजूर

भुसावळ, १३ फेब्रुवारी
नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत पाणीटंचाई व पाणीपुरवठ्यासह विविध विकासकामांच्या १५ विषायांना १५ मिनिटांच्या चर्चेत मंजुरी देण्यात आली.
 
 
पालिकेची सर्वसाधारण सभा १३ रोजी पालिका सभागृहात नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. व्यासपीठावर मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर, उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, गटनेता मुन्ना तेली यांच्यासह समिती सभापती उपस्थित होते.
 
 
या विषयांना मिळाली मंजुरी- पथदिवे, हायमास्ट पथदिवे दुरुस्ती करणे, अग्निशामक अधिकार्‍यासाठी निवासस्थान बांधणेख, प्रभाग क्रमांक २४ सर्व्हे नंबर ११९ वॉल कंपाऊंड बांधून बेन्चेस बसविणे, लहान मुलांसाठी खेळणी साहित्य खरेदी करणे, आयुर्वेदिक दवाखान्याची औषधी खरेदी करणे, जंतुनाशक पावडर खरेदी करणे, हिंदू स्मशानभूमीसाठी संरक्षण भिंत बांधणे, मुस्लीम कब्रस्तानमधील संरक्षण भिंत बांधणे, ख्रिश्चन कब्रस्तानमध्ये संरक्षण भिंत बांधणे, पाण्याची सोया-दिवाबत्ती व्यवस्था करणे, नाथपंथी, गोसावी समाज यांची दफनभूमीमध्ये संरक्षण भिंत बांधणे, शहरातील रस्त्यालगतच्या झाडे झुडुपे जेसीबी मशीनद्वारे काढणे. बालवाडी, आगाखानवाड्यात शौचालय बांधणे, यासह १५ विषयांना पालिका सभेत मंजुरी देण्यात आली.