न्यूझीलंड मध्ये ज्वालामुखीचा उद्रेक !

    दिनांक : 09-Dec-2019
न्यूझीलंडमध्ये एका ज्वालामुखीचा उद्रेक झाला असून त्यानंतर "अनेक लोक बेपत्ता" असल्याचं पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी सांगितलं आहे. व्हाकारी याठिकाणी हि घटना अघडली आहे. याविषयीचे काही फ़ोतोहिओ पर्यटकांनी ट्विटर वर शेअर केले आहेत.

b_1  H x W: 0 x 
 
उद्रेक होण्याच्या काही क्षणांपूर्वी अनेक पर्यटक व्हाईट आयलंड किंवा व्हाकारी नावाच्या या ज्वालामुखीच्या कडावर चालताना दिसले होते. या ज्वालामुखीतून बाहेर काढण्यात आलेल्या एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे.
व्हाकारी हा न्यूझीलंडच्या सर्वांत सक्रीय ज्वालामुखींपैकी एक मानला जातो. तरीही त्याचे जवळून दर्शन घेण्यासाठी शेकडो पर्यटक दररोज इथे गर्दी करतात. या ज्वालामुखीवरून पर्यटकांसाठी विशेष हवाई सफरीसुद्धा उपलब्ध आहेत.