भारतीय सैन्यावर मोठा सायबर हल्ला !

    दिनांक : 09-Dec-2019
नवी दिल्ली: भारताच्या सैन्यदलावर शुक्रवारी रात्री उशिरा हॅकर्सनी सायबर हल्ला केला आहे. यामुळे सावध झालेल्या सैन्यदलाने आपत्कालीन स्थिती घोषित केली असून कोणताही मेल उघडताना त्यावर नोटीस असे शिर्षक असल्यास उघडू नये, असे आदेश जारी केले आहे.
 

ल_1  H x W: 0 x 
 
शनिवारी ही सूचना देण्यात आली आहे.हा आपत्कालीन अलर्ट तिन्ही सैन्यदलांना देण्यात आला असून एचएनक्यू नोटिस फाइल.एक्सएलएस या हायपरलिंकसोबत फिशिंग मेल सैन्य दलातील जवानांना पाठविण्यात येत आहेत. हे मेल 'पीआरवीआयएनएवायएके.598के@जीओवी.आयएन' या ईमेल आयडीवरून पाठविण्यात येत आहेत, असे या सूचनेमध्ये म्हटले आहे. इनबॉक्समध्ये हा मेल आल्यास तो उघडून नये, अशा प्रकारच्या मेलपासून सावध रहा आणि त्याची तक्रार करा तसेच तो मेल डिलीट करावा, असे या सूचनेमध्ये म्हटले आहे.
  
देशाच्या महत्वाच्या ताकदीवर हा सायबर हल्ला केला जात आहे. हा हल्ला पाकिस्तान किंवा चीनमधून केला जात आहे. जसे हे हल्ले वाढू लागले तसे सैन्याची सायबर टीम सतर्क झाली आहे. सरकारनेही सैन्यदलासाठी सायबर एजन्सी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या एजन्सीचे काम चीन आणि पाकिस्तानातून होणाऱ्या सायबर हल्ल्यांना रोखणे आणि परतवून लावण्याचे असणार आहे, असे सेनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. या सायबर हल्ल्यामागे नवीन ट्रेंड दिसत आहे. पाकिस्तानी गुप्तहेर भारतीय सैन्याच्या जवानांना त्यांच्या जाळ्यामध्ये ओढण्यासाठी दुसऱ्या देशांचा वापर करत आहेत. अनेक प्रकरणांत हे गुप्तहेर दुसऱ्या देशांचे सुरक्षा अधिकारी असल्याचे सांगून भारतीय सेनेच्या तंत्रज्ञान प्रणालीमध्ये घुसलेले आहेत, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.