विराटने असा केला विल्यम्सचा हिशेब चुकता

07 Dec 2019 13:26:06
हैदराबाद : वेस्ट इंडिज संघाचे खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांच्या अनोख्या सेलिब्रेशनसाठी ओळखले जातात. पण कालच्या टी-ट्वेंटी सामन्यात चक्क विराट कोहलीने आपल्या खेळीचे असे काही सेलिब्रेशन केले कि सारे अवाक झाले. निमित्त ठरले विंडीजचा गोलंदाज केसारिक विल्यम्सन. इंडिजचा गोलंदाज केसरिक विल्यम्स खेळाडूला बाद केल्यानंतर विराटने डायरीचे पान फडल्यची नक्कल करत दोन वर्षापूर्वीच्या आपल्या वर केलेल्या टिंगलचा हिशेब चुकता केला.
 
दोन वर्षापूर्वी झालेल्या एका सामन्यात विराटला बाद केल्यानंतर विल्यम्सन ने ह्या घटनेची आपण डायरीत नोंद करत आहोत अशी नक्कल करत विराटला डिवचले होते. विराटने त्याचा आज हिशेब चुकता केला. काल सामन्यात रोहित शर्मा लवकर बाद झाल्यावर फलंदाजीला आलेला विराट सुरूवातीला चाचपडताना दिसला. त्यामुळं कॅरेबियन खेळाडूंनी त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला.

v_1  H x W: 0 x
 
वेस्ट इंडिजचा गोलंदाज विल्यम्स आणि विराटचे या अगोदरच शाब्दिक बाचाबाची झालेली आहे. या सामन्यातही षटक टाकताना विराट धाव घेत असताना त्याच्या रस्त्यात आडवा आला. त्यामुळे विराट चिडला व त्याने अम्पायर कडे त्याविषयी तक्रारही केली. पण तेव्हा विराट आक्रमक झाला अन् नंतरच्या विल्यम्सनच्या षटकात विराटनं सलग षटकार, चौकार मारले . त्यानंतर विराटनं भर मैदानात विल्यम्सची डायरी काढत त्या डायरीतील पानं फाडून टाकल्याची नक्कल केली व दोन वर्ष पूर्वीचा वचपा काढला. विराट च्या या सेलिब्रेशन मुळे त्याचे चाहते बेहद खुश होऊन जल्लोष करताना दिसले. कालच्या सामन्यात विल्यम्स सगळ्यात महागडा गोलंदाज ठरला. त्याला एकही विकेट घेता आली नाही.
Powered By Sangraha 9.0