वीरप्पनचा खात्मा करणारे के.विजयकुमार गृहमंत्रालयाचे वरिष्ठ सल्लागार

    दिनांक : 07-Dec-2019
नवी दिल्ली: गृहमंत्रालयाचे वरिष्ठ सुरक्षा सल्लागार म्हणून निवृत्त आयपीएस अधिकारी के. विजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कर्नाटकातील कुख्यात गुंड व चंदन तस्कर असलेल्या वीरप्पनचा आयपीएस के. विजय कुमार यांनी खात्मा केला होता. विजय कुमार तेव्हापासून पासून चर्चेत आले होते. गृहमंत्रालयाने त्यांच्यावर केंद्रशासित प्रदेश जम्मु-काश्मीरच्या सुरक्षेसंबंधी सल्ला देण्याची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे ग्रह मंत्रालयामार्फत होणाऱ्या रणनीती मध्ये विजय कुमार यांचा अनुभव कमी येणार आहे.

ज_1  H x W: 0 x 
 
छत्तीसगडमधील दंतेवाडामध्ये सीआरपीएफच्या 75 जवानांची वर्ष 2010 मध्ये हत्या करण्यात आली होती. तेव्हा विजय कुमार यांची सीआरपीएफच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. तसेच 1998 ते 2001 पर्यंत ते सीमा सुरक्षा बलमध्ये इंस्पेक्टर जनरल (आयजी) या पदावर होते. यापूर्वी जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांचे सल्लागार म्हणून विजय कुमार यांनी काम केले आहे. त्यांनी एक अधिकारी म्हणून यशस्वीरित्या स्पेशल टास्क फोर्सचे नेतृत्व केले आहे. त्याच बरोबर त्यांनी चंदन तस्कर वीरप्पनला ठार केले आहे. वीरप्पनची तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात दहशत होती.