राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राने १२७६ कोटी रुपयाची दिली मदत - नरेंद्रसिंग तोमर

06 Dec 2019 19:00:33
नवी दिल्ली: राज्यात सप्टेबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसानुले शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यासाठी केंद्र सरकारने आत मदत जाहीर केली आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2019 मध्ये अवकाळी पावसामुळे 94.53 लाख हेक्टर (33 टक्क्यांहून अधिक) क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती महाराष्ट्र सरकारने दिली आहे. सुमारे 103.52 लाख शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे तर राज्यातील 29 जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला होता.



l_1  H x W: 0 x 
राज्य सरकारकडून निवेदन मिळण्यापूर्वीच केंद्रीय गृह मंत्रालयाने आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथक 29 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर आणि 14 ते 16 ऑक्टोबर दरम्यान नुकसानीच्या मूल्यमापनासाठी महाराष्ट्रात पाठवले होते. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे एनडीआरफमधून 2110.62 कोटी रुपयांच्या अर्थसहाय्याची मागणी केली होती. तथापि राज्याला भेट दिलेल्या केंद्रीय पथकाच्या अंतरिम अहवालाच्या आधारे महाराष्ट्राला 600 कोटी रुपयांची अंतरिम मदत देण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त एसडीआरएफमधून केंद्राचा हिस्सा म्हणून 676.125 कोटी रुपये देण्यात आला. त्यामुळे राज्याला एकूण 1276.125 कोटी रुपयाची आर्थिक मदत होणार आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
आपत्ती व्यवस्थापनाची प्राथमिक जबाबदारी राज्य सरकारची असते. केंद्र सरकार राज्यांना परिस्थितीचा सामना करण्यासाठी शक्य ती सर्व प्रकारची मदत देत असते. राज्य सरकार नुकसानीचे मूल्यमापन करून राज्य आपत्ती निवारण निधीतून आर्थिक मदत देते. निहित प्रक्रियेनुसार ज्यामध्ये आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथकाच्या मूल्यमापनाचा समावेश असतो. त्यानुसार राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून अतिरिक्त आर्थिक सहाय्य दिले जाते.
Powered By Sangraha 9.0