हैदराबाद दिशा बलात्कार प्रकरण: चारही आरोपींचा पोलिसांकडून खात्मा!

    दिनांक : 06-Dec-2019
हैदराबाद: हैदराबाद येथील डॉ. दिशा बलात्कार प्रकरणाने देशभरात संतापाची लाट उसळली असताना आज पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास पोलिसांनी घटनास्थळी झालेल्या चकमकीत आरोपींना गोळ्या घातल्याचे वृत्त आहे. पोलिसांच्या या कृतीमुळे त्यांच्यावर देशभरातून कौतुक होत आहे. पिडीताला न्याय मिळाल्याच्या भावना जनतेत उमटताना दिसत आहे.

j_1  H x W: 0 x 
 
डॉ. दिशा हैदराबाद येथे एका दवाखान्यात डॉक्टर म्हणून काम बघत होती. मागील आठवड्यात तिच्यावर चार आरोपींनी बलात्कार करून नंतर जाळून ठार केल्याची हृदय द्रावक घटना घडली होती. त्यामुळे देशभरात याविषयी मोठा संताप व्यक्त होत होता. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी देशभरातून होत होती. परंतु, आज पहाटे पोलीस आरोपींना घटनास्थळी चौकशी साठी घेऊन गेले असता आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या चकमकीत चारही आरोपी मारले गेल्याचे वृत्त आहे. त्यामुळे देशभरात हैदराबाद पोलिसांचे कौतुक होत आहे.