दिल्ली-युपीच्या पोलिसांनी आदर्श घ्यावा - मायावती

    दिनांक : 06-Dec-2019

लखनऊ: हैदराबाद येथील दिशा बलात्कार प्रकरणातील आरोपी आज सकाळी पळून जात असताना एन्काउंटरमध्ये मारले गेले. पोलीस आरोपींना चौकशीसाठी घटनास्थळी घेऊन गेले असता चकमकीत आरोपी मारले गेले. या एन्काउंटरमुळे देशात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे. आरोपींच्या एन्काउंटरनंतर बसपा नेत्या मायावती यांनी तेलंगणा पोलिसांचे कौतुक केले आहे.

 

न_1  H x W: 0 x 
 
मायावती यांनी  'उत्तर प्रदेश व दिल्लीच्या पोलिसांनी यापासून धडा घ्यावा,' असं मत व्यक्त केलं आहे. उत्तर प्रदेशात महिलांवरील अत्याचारांत सतत वाढ होत आहे. मात्र, राज्य सरकार झोपलं आहे. खरंतर, तेलंगणच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईपासून उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या पोलिसांनी प्रेरणा घ्यायला हवी. मात्र, यूपीमध्ये जंगलराज आहे. इथं गुन्हेगारांना सरकारी पाहुण्यासारखी वागणूक दिली जाते, हे दुर्दैव आहे,' अशी खंतही मायावती यांनी व्यक्त केली.