चोरीचे फोन विकताना चोरट्यांना रंगेहात पकडले ; पोलिसांची बहादुरी

    दिनांक : 05-Dec-2019
शिरपूर: दि. 02 रोजी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून दोन जणांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून १८ मोबाईल फोन चोरल्याचे काबुल करण्यात आले आहे. दहिवद येथील दोन इसम हे काही महागडे टच स्क्रीन मोबाईल चोरुन लपुन विक्री करीता ग्राहक शोधत असल्याची बातमी पोलिसांना मिळाली होती. सदर माहितीच्या अनुषंगाने स.पो.नि. पाटील यांनी पथक तयार करुन सदर व्यक्तींना ताब्यात घेण्यासाठी सापळा रचला व चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या.

ल_1  H x W: 0 x 
 
पोलीसांनी लावलेल्या सापळया मध्ये सदर मोबाईल विक्रीचे तयारीत असलेले इसम नामे उमेश विश्वनाथ चव्हाण व सुनिल भटु सोनार दोन्ही रा. दहीवद ता.शिरपुर हे त्यांचे ताब्यातील सॅमसंग,नोकीया,एम.आय.रेडमी ओपो अश्या विविध नामांकीत कंपन्यांचे एकुण 18 टच स्क्रीन मोबाईल मिळाले आहेत. त्यांची किंमत सुमारे 1,50,000 रुपये असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडील मोबाईल फोन ताब्यात घेवुन मुबई पोलीस कायदा कलम 124 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मा.पोलीस अधिक्षक विश्वास पांढरे सो., मा.अपर पोलीस अधिक्षक राजु भुजबळ सो.. मा.उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर, अनिल माने सो. यांचे मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पो.स्टे.चे वरील पथकाने ही कारवाई केलेली आहे.
दोघे संशयीत इसमांनी चौकशी दरम्यान असे कबुल केले की , त्यांनी सदरचे मोबाईल मागील एक ते दोन महिन्यापासुन वेळोवेळी रात्री व पहाटेचे वेळेस दहिवद गावातील वेगवेगळया घरांमधुन लबाडीने चोरुन जमा केले आहेत व ते आता सदर मोबाईल फोनची विल्हेवाट लावण्याचे तयारीत होते. या प्रकरणी संशयीतांनी दिलेल्या कबुलीच्या अनुशंगाने दहिवद गावातील तसेच आसपासचे परिसरातील मोबाईल फोनचे मुळ मालकांशी संपर्क साधण्यात आले आहे. या प्रकरणी संबधीत दोघे संशयीताविरुध्द स्वतंत्र्य गुन्हे दाखल करुन घेण्याची कारवाई करण्यात येत असुन या प्रकरणात घरातुन संशयीतांनी मोबाईल चोरी केल्याचे एकुण 9 गुन्हे उघडकीस आणण्यात आलेले आहेत. तसेच वरील सर्व 18 मोबाईल फोन यांचे मुळ मालक निष्पन्न झाल्याने सदर मोबाईल फोन हे त्यांचे मुळ मालकांचे ताब्यात देण्याची कार्यवाही देखील करण्यात येत आहे.