पी.चिदंबरम यांना जामीन मंजूर

04 Dec 2019 14:52:03
आयएनएक्स मीडिया प्रकरणात कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम तीन महिन्यापासून अटकेत होते. अटक झाल्यापासून त्यांचा जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु होता. आज त्यास यश आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आर. भानुमती यांच्या अध्यक्षतेखाली आज निर्णय सुनावला आहे. दोन हमीदारांसह २ लाख रूपयांच्या बॉण्डवर न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंठपीठाने हा निकाल दिला.

h_1  H x W: 0 x
अटकेत असलेल्या माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांचा जामीन दिल्ली उच्च न्यायालयाबरोबरच सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर चिदंबरम यांना २१ ऑगस्ट रोजी त्यांच्या निवासस्थानावरुन सीबीआयने अटक केली होती. अटक झाल्यापासून पी. चिदंबरम जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात जामीन दिला आहे. आता ईडीच्या गुन्ह्यातही त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.
चिदंबरम यांना जामीन देताना न्यायालयाने काही अटी घातल्या आहेत. तपास यंत्रणांना चौकशीला पूर्ण सहकार्य करावे लागेल. त्याचबरोबर परवानगीशिवाय देश सोडून जाता येणार नाही. या प्रकरणाशी संबंधित कोणत्याही साक्षीदाराला संपर्क करू नये किंवा त्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करण्यास न्यायालयाने मज्जाव केला आहे. तसेच या प्रकरणाबाबत सार्वजनिक मंचावर बोलू नये आणि माध्यमांनाही कुठलीही मुलाखत देऊ नये, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
Powered By Sangraha 9.0