सूर्यकिरण - १४ युद्ध सरावास नेपाळमध्ये प्रारंभ

    दिनांक : 04-Dec-2019
भारताचा दरवर्षी विविध देशाच्या सैन्यासोबत सामायिक युद्ध सराव होत असतो. युद्धनीती व अंतरराष्ट्रीय शांततेच्या दृष्टीने हे युद्ध सराव महत्वपूर्ण असतात. दोन देशातील सैनिकी संस्कृतीची देवान-घेवाण याद्वारे शक्य होते. सूर्य किरण-14 या भारत आणि नेपाळ लष्करांदरम्यानच्या 14 व्या द्विपक्षीय वार्षिक लष्करी कवायतींना आज नेपाळमधल्या रुपनदेही जिल्ह्यात प्रारंभ झाला. नेपाळ लष्कर युद्धशाळा येथे हा युद्धसराव सुरु आहे.

ज_1  H x W: 0 x 
 
 
भारतीय लष्कर आणि नेपाळचे लष्कर यांदरम्यान तुकडी स्तरावर एकत्रित प्रशिक्षण उपलब्ध करून देणे हा या कवायतींचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये जंगलातील युद्ध, डोंगराळ भागातील दहशतवाद विरोधी मोहीम, आपत्ती निवारण आदी विषयांचा या कवायतींमध्ये समावेश आहे. तेराव्या संयुक्त कवायतींचे उत्तराखंडमधल्या पिथोरागड येथे गेल्यावर्षीच्या जूनमध्ये आयोजन करण्यात आले होते. दर सहा महिन्यांनी भारत आणि नेपाल मध्ये हा युद्ध सराव आयोजित केला जातो.