भारत-जर्मनी रेल्वे विषयक कराराला केंद्रीय मंत्री मंडळाची मंजुरी

    दिनांक : 04-Dec-2019
मुंबई: भारत-जर्मनीतल्या रेल्वे विषयक कराराला केंद्रीय मंत्री मंडळाची नुकतीच मंजुरी मिळाली आहे. रेल्वे क्षेत्रात धोरणात्मक प्रकल्प सहकार्याविषयी भारत आणि जर्मनी यांच्यात झालेल्या संयुक्त ठराव घोषणेबाबत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत माहिती देण्यात आली. या संयुक्त ठराव घोषणा पत्रावर गेल्या महिन्यात स्वाक्षऱ्या झाल्या होत्या.

b_1  H x W: 0 x 
 
जर्मनिसोबत झालेल्या या करारामुळे भारताला रेल्वे क्षेत्रातल्या अद्ययावत घडामोडी आणि ज्ञान यांची देवाण घेवाण करण्यासाठी मदत होणार आहे. तसेच जर्मनीच्या आर्थिक व्यवहार आणि उर्जा मंत्रालयाशी झालेल्या या संयुक्त उद्दिष्ट घोषणेमुळे, रेल्वे क्षेत्रातल्या अद्ययावत घडामोडी आणि ज्ञान यांची देवाण घेवाण करण्या बरोबरच आणि संवाद साधण्यासाठी भारतीय रेल्वेला, मंच उपलब्ध होणार आहे. यामुळे, माहितीचे आदान प्रदान, तज्ञांच्या बैठका, चर्चासत्र, तंत्र विषयक बैठका आणि संयुक्त सहमती सहकार्य प्रकल्पांची अंमलबजावणी सुलभ होणार आहे.
रेल्वे क्षेत्रातल्या तंत्र विषयक सहकार्यासाठी, रेल्वे मंत्रालयाने, विविध देशातली सरकारे आणि राष्ट्रीय रेल्वे यांच्यासमवेत सामंजस्य करार, सहकार्य करार, प्रशासनिक व्यवस्था आणि संयुक्त इरादा घोषणा पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. हाय स्पीड रेल्वे, सध्याच्या रेल्वे मार्गावरची गती वाढवणे, स्थानकांचा जागतिक तोडीचा विकास, रेल्वे पायाभूत संरचनेचे आधुनिकीकरण या क्षेत्रातल्या सहकार्याचा यात समावेश आहे.
या सामंजस्य करार, सहकार्य करार, प्रशासनिक व्यवस्था आणि संयुक्त उद्दिष्ट घोषणा पत्रामुळे, तंत्रविषयक तज्ञ, अहवाल, तांत्रिक दस्तावेज, प्रशिक्षण आणि चर्चासत्र, कार्यशाळा या क्षेत्रात देवाण घेवाण आणि संवादाची सुविधा प्रदान करण्यात येते.