पाचोरा येथील तहसीलदारांची अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर धडक कारवाई

    दिनांक : 31-Dec-2019
पाचोरा :  गिरणा नदी पत्रातील वाळूला चांगली मागणी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जात आहे. पाचोरा तालुक्यातील दुसखेडा जवळील गिरणा नदी पात्रात अवैध वाळू उपसा चालू असल्याची बातमी मिळाल्यामुळे तहसीलदार कैलास चावडे यांनी कारवाई करीत वाळू उपसा करणारी वाहने ताब्यात घेतली आहे.

ओ_1  H x W: 0 x 
 
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा तहसीलदार कैलास चावडे यांना गोपनीयरीत्या मिळालेल्या माहितीनुसार दुपारी तीन वाजेच्या सुमारास तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त पथकाने दुसखेडा गावाजवळ गिरणा नदीपात्रात अचानक दौरा केला. त्यावेळी डंपर क्रमांक (एम एच-१९/सी वाय-२४४९) व डंपर क्रमांक (एम एच-१९/झेड-५४७०) तसेच एक पोकलँड पीसी-२१०/एलसी आढळून आले. तहसीलदारांच्या या पथकाने दोन्ही डंपर व पोकलँड ताब्यात घेऊन दोन्ही डंपर पोलीस लाईन आवारात उभी करण्यात आली असून पोकलँड पोलिस पाटलाच्या ताब्यात देऊन ग्रामपंचायतच्या जागेवर उभे करण्यात आले आहे.
 

ओ_1  H x W: 0 x 
या पथकात पाचोरा तहसिलचे नायब तहसिलदार उमाकांत कडनोर, मंडळ अधिकारी गणेश हटकर, शिपाई गणेश चौधरी यांचा समावेश होता. सदरील घटनेबाबत पाचोरा तहसिलदार कैलास चावडे यांनी दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे जळगाव तरुण भारतशी बोलताना सांगितले. अवैध वाळू उपसा जिल्हा भारत मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून वेळोवेळी याबाबत कारवाई करूनही अवैध वाळू उपसा चालूच असल्याने प्रशासनाने कडक कारवाईचे धोरण अवलंबावे अशी मागणी जोर धरत आहे.