जामनेर पालिकेच्या वर्षाअखेरच्या सभेत २८ विषयांना मंजुरी

    दिनांक : 31-Dec-2019
जामनेर- येथिल नगर पालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या अध्यक्षतेखाली ३० रोजी सकाळी ११ वाजता पालीकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात बोलाविण्यात आलेल्या वर्षा अखेरच्या सभेत विविध २८ विषयांच्या ठरावावर एकमताने मंजुरी देण्यात आली.
 
j_1  H x W: 0 x 
 
यावेळी सभेला शिक्षण संस्थेचे सचिव जितू पाटील, उपनगराध्यक्ष अनीस शेख,गटनेता डॉ.प्रशांत भोंडे, प्रा.शरद पाटील, संध्या पाटील, शितल सोनवणे,बाबुराव हिवराळे,अतिष झाल्टे, रिजवान शेख, रतन गायकवाड,कैलास नरवाडे, ज्योती सोन्ने, ज्योती पाटील, मंगला माळी, उल्हास पाटील, पुखराज डांगी, सुहास पाटील, सुधाकर माळी, दत्तू सोनवणे, धोंडू पाटील आदी नगरसेवक-नगरसेवीका, मुख्याधिकारी राहुल पाटील, साहाय्यक मुख्याधिकारी दुर्गेश सोनवणे, ईश्वर पाटील, सिएन खर्चे, विजय राजुपुत ,रमेश हिरे,दत्तू जोहरे,आदी आधिकारी, कर्मचारी होते.