"नवीन ध्येय स्थापित करण्यासाठी योग्य वेळ" - राष्ट्रपतींच्या देशवासियांना शुभेच्छा

    दिनांक : 31-Dec-2019
नवी दिल्ली: अनेक सुखद वाईट घडामोडींसह २०१९ वर्ष आज निरोप घेत आहे. नवीन वर्षाच्या पूर्व संध्येला नवीन वर्षाची सुरुवात चांगली व्हावी यासाठी सर्व जन आपापल्या मित्र परिवारात व नातेवाईकांना शुभेच्छा देत आहेत. देशाच्या राष्ट्रपतींनी सुद्धा सर्व भारतीय नागरिकांना नवीन वर्षासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 
 

स्क्ष_1  H x W: 
 
नवीन वर्ष 2020च्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी देशातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत“हे नवीन वर्ष म्हणजे, नवनवीन गोष्टींची सुरुवात करण्यासाठी, जीवनात नवीन ध्येय स्थापित करण्यासाठी आणि नवीन संकल्प करण्यासाठीची योग्य वेळ आहे.
 
प्रथम एक व्यक्ती म्हणून आणि सामुहिकरित्या एक राष्ट्र म्हणून आपली खरी क्षमता दाखवून देण्यासाठी सर्वोत्तम कार्य करण्याची आपण प्रतिज्ञा करु या. या आनंदमय प्रसंगी संपूर्ण जगाच्या सुख, समृद्धी आणि भरभराटीसाठी आपण प्रार्थना करु या”, असे उपराष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.