रहस्य चित्रपटाच्या पोस्टरचे नंदुरबार येथे अनावरण

    दिनांक : 31-Dec-2019
नंदुरबार : दिग्दर्शक भावेश पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ येथील परिसरात रहस्य या चित्रपटाची शूटिंग करण्यात आले आहे. प्रत्येक नवी रात्र ही रहस्याला जन्म देत असते. अशाच एका रहस्याचा आणि त्या रहस्याचा शोध घेण्याच्या प्रवासाचा थरारक अनुभव देणारा ‘भावेश प्रोडक्शन्सचा’ ‘रहस्य’ हा आगामी मराठी चित्रपट ७ फेब्रुवारी २०२० ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

j_1  H x W: 0 x 
 
तत्पूर्वी कलाकार व तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत चित्रपटाचा शानदार पोस्टर अनावरण नंदुरबार येथील शुगर प्राइस हॉटेलमध्ये चित्रपटाची पोस्टरचे अनावरण धुळे येथील भाजपाचे नेता संजय शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले . तसेच नंदुरबार येथील आर आर पाटील हेदेखील उपस्थित होते. संजय शर्मा म्हणाले की चित्रपट मराठी भाषेतून प्रदर्शने होणे ही पहिली वेळ आहे यांनी ‘रहस्य’ चित्रपटाला व चित्रपटाच्या संपूर्ण टीमला यावेळी शुभेच्छा दिल्या. भव्यदिव्य स्वरूपात चित्रपट सादर करून पडद्यावर लोकांना वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न ‘रहस्य’ चित्रपटातून केला असून आमचा हा प्रयत्न प्रेक्षकांना आवडेल असा विश्वास दिग्दर्शक भावेश पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केला. घडणार्‍या रहस्यमय घटनांचा तपास आणि त्या तपासाअंती बाहेर येणारं दडलेलं ‘रहस्य’ हा या चित्रपटाचा गाभा आहे. लकी बडगुजर, राकेश बागुल, स्वाती पाटील, ऋतुजा सोनार, स्वाती शुक्ला आदी कलाकारांच्या यात भूमिका आहेत.