मुलीने आरती केली म्हणून आफ्रिदीने फोडला टीव्ही

    दिनांक : 30-Dec-2019
इस्पालामाबाद : पाकिस्तानात हिंदूंबाबत असलेली चीड पुन्हा एकदा नव्याने समोर आली आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटू दानिश कानेरियाला दिलेल्या वागणूकीनंतर आता शाहिद अफ्रिदीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत त्याला हिंदू धर्माबद्दल असलेली चीड स्पष्ट दिसून येत आहे.

a_1  H x W: 0 x 
 
शहिद अफ्रिदीची एक मुलाखत सुरू असताना त्याला निवेदिकेने तु कधी टीव्ही फोडलायस का असे विचारले. त्यावर त्याने त्याच्या घरात घडलेला एक किस्सा शेयर केला. 'माझी बेगम त्या स्टार प्लसवरच्या मालिका बघायची. त्यात त्या आरती वगैरे दाखवली जायची. एके दिवशी माझी मुलगी देखील हातात ताट घेऊन टीव्ही समोर आरती सारखं काहीतरी करत होती. तिला ते करताना बघून मला इतका राग आला की मी तो टीव्ही जोरात भिंतीवर आदळला', असे शहिद अफ्रिदीने या मुलाखतीत सांगितले. आफ्रिदीच्या या अनुभवावर कार्यक्रमात उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. यावरून पाकिस्तानची  धर्मांध मानसिकता
उघडी पडली आहे. 
 
 
 
भारताकडून सर्वधर्म समभावाची अपेक्षा करणाऱ्या व मानवतावादाची आवई काढणाऱ्या पाकिस्तानातील प्रसिद्ध माजी क्रिकेटर शहीद आफ्रिदी याच्या हिंदुद्वेषी अनुभवावरून तेथील अन्य मुस्लीम समाज हिंदूंकडे किती द्वेषपूर्ण भावनेने बघतो यच्घी जाणीव होते. तसेच स्वतःच्या धर्माबाबतची कट्टरता व धर्मांधता पाकिस्तानात किती मोठ्या प्रमाणात वाढली आहे, हे यावरून लक्षात येते.