झारखंडच्या मुख्यमंत्री पदाची सोमेन सोरेन यांनी घेतली शपथ

    दिनांक : 30-Dec-2019
रांची: झारखंडमध्ये रविवारी हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हेमंत सोरेन यांना रांचीतील मोरहाबादी मैदानात राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सोरेन यांच्याव्यतिरिक्त काँग्रेस आणि आरजेडीच्या आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. झारखंडमध्ये जेएमएम-काँग्रेस-आरजेडी महाआघाडी सरकारचे मुख्यमंत्री बनलेले हेमंत सोरेन झारखंडचे ११ वे मुख्यमंत्री बनले आहेत.
 

a_1  H x W: 0 x 
सोरेन यांच्यासह काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाचे नेते आलमगीर आलम आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष रामेश्वर उराव यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस नेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, माजी खासदार शरद यादव, खासदार संजय सिंह, राजद नेते तेजस्वी यादव, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, सुबोध कांत सहाय, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत उपस्थित होते. या व्यतिरिक्त डीएमके नेते एमके स्टालिन, जेएमएम नेते आणि हेमंत सोरेन यांचे वडील शिबू सोरेन, माजी केंद्रीय मंत्री आरपीएन सिंह, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि माजी मुख्यमंत्री रघुबर दास हेही उपस्थित होते.
४४ वर्षीय हेमंत सोरेन झारखंडचे सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री ठरले आहेत. झारखंड विधानसभेच्या निवडणुकीत हेमंत सोरेन यांचा पक्ष झारखंड मुक्ती मोर्चाला सर्वाधिक ३० जागा मिळाल्या, तर भाजपला २५ जागा मिळाल्या. झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि राजद महाआघाडीचं सरकार स्थापन झाले.