CAA विरोधातील आंदोलनात ओसामा बिन लादेन प्रकटला

    दिनांक : 30-Dec-2019
नवी दिल्ली: CAA च्या विरोधात नवी दिल्लीत जमलेल्या मुस्लीम समुदायातील एका तरुणाने आपले नाव "ओसामा बिन लादेन" सांगितल्यामुळे सोशल मीडियात संतापजनक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना या तरुणाने आपले नाव अमेरिकेने ठार केलेल्या क्रूर दहशतवादी ओसामा बिन लादेन याचे नाव सांगितले. त्यामुळे CAA च्या विरोधातील खरे कारण काय ? असा प्रश्न नेटकरी उपस्थित करीत आहे.
 

ब_1  H x W: 0 x 
 
 
केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याला देशातील मुस्लीम संघटना व कॉंग्रेससह विरोधी पक्ष विरोध करत आहेत. यासाठी देशभरात विविध ठिकाणी आंदोलने व निदर्शने झाले आहेत. पूर्वांचलातील काही काही भागात NRC ला व CAA ला विरोध सुरु झाल्यानंतर त्याचे लोण देशातील उत्तर भारतात पसरले. नवी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात यास मोठा विरोध झाला व पोलिसांसोबत हिंसाचाराच्या घटना ही घडल्या.
 
 
अश्याच एका आंदोलना दरम्यान नवी दिल्लीत पत्रकाराने एका तरुणाला आपण येथे कश्यासाठी आलात? असा प्रश्न केला असता त्या मुस्लीम तरुणाने "विरोध करायला" इतकेच उत्तर दिले. त्यानंतर त्याला नाव विचारले असता त्याने आपले नाव चक्क 'ओसामा बिन लादेन' सांगितले. त्याच्या या प्रतिक्रियेवर त्याच्या सोबत असलेल्या मित्रांनी हश्या उडवला. पत्रकाराने पुढे विचारलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर या तरुणाला देता आले नाही. आपण इथे कश्यासाठी आलो आहोत व CAA तसेच NRC काय आहे, हेसुद्धा त्याला सांगता आले नाही. परंतु, त्याने त्याने सांगितलेल्या आपल्या नावावरून त्यांच्या मनातील ओसामा बद्दलची भावना स्पष्ट झालीच, शिवाय अनेक धर्मांध संघटनांमुळे देशातील तरुणांच्या मनात दहशतवादी जागा घेऊ लागल्याचे आता दिसून येत आहे. त्यामुळे ही चिंतेची बाब ठरत आहे.
 
 
 
 
दिल्लीतील जे एन यु विद्यापीठातही भारताने फाशीची शिक्षा दिलेल्या दहशतवादी अफजल गुरूची जयंती साजरी केली होती, तर त्याच्याविषयी जयघोष केला होता. एवढेच काय तर देशविरोधी घोषणा देखील देण्यात आल्या होत्या. यावरून मोठा वाद झाला होता.