विक्रम लँडरचे अवशेष सापडले !

    दिनांक : 03-Dec-2019
चेन्नई: चंद्राकडे झेपावलेले इस्रोचे चांद्रयान -२ मिशन अंतर्गत विक्रम लँडर सप्टेंबर महिन्यात चंद्रावर उतरताना संपर्का अभावी भरकटले होते. तेव्हापासून इस्रोमार्फत त्याचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरु होती. इस्रोच्या मदतीसाठी नासा ने ही शोधकार्य सुरु केले होते. परंतु चेन्नई येथील कॉम्पुटर प्रोग्रामर असलेल्या एस. सुब्रमण्यम या तरुणाने नासाच्या छायाचित्राचा अभ्यास करून विक्रम लँडर चा शोध घेतला आहे. याबद्दल नासानेही ट्विटर वरून स्पष्टोक्ती केली आहे.
 

j_1  H x W: 0 x 
 
ज्या ठिकाणी विक्रम लँडरचा संपर्क तुटला होता, त्या ठिकाणी २०१७ मधील काही छायाचित्र व संपर्क तुटल्या नंतरचे छायाचित्र याचा अभ्यास एस. षण्मुगम यांनी केला. ज्यामध्ये विक्रम लँडरच्या तुकड्यांचा काही भाग दिसून आल्याचा दावा त्यांनी केला. त्यांच्या या दाव्यास एलआरओएमचे उप-प्रकल्प वैज्ञानिक जॉन केलर यांनी मान्य करत त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी दिलेल्या इमेल स्वरूपातील माहितीच्या आधारे आम्हाला विक्रम लँडरचे अवशेष शोधण्यास मदत झाली याबद्दल ऋण ही व्यक्त केले आहे. त्यामुळे एस. सुब्रमण्यम यांचे देशभरात त्यांच्या कार्याबद्दल कौतुक व्यक्त होत आहे.