समुद्री तट विकासासाठी सरकारचा ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र कार्यक्रम

    दिनांक : 03-Dec-2019
मुंबई: देशातल्या निवडक समुद्रकिनाऱ्यांसाठी ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र कार्यक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री बाबूल सुप्रियो यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात दिली. यानुसार समुद्री तट विकास, सुरक्षा व स्वच्छता यांचा विकास केला जाणार आहे.

ह_1  H x W: 0 x 
 
 
पर्यावरण, शिक्षण आणि माहिती, पर्यावरण व्यवस्थापन आणि जतन, समुद्र किनाऱ्यांची सुरक्षितता यासारख्या चार विभागातल्या 33 कठोर निकषांवर आधारित डेन्मार्कमधल्या आंतरराष्ट्रीय एजन्सीकडून हे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यासाठी प्रायोगिक तत्वावर शिवराजपुर (गुजरात), भोगवे (महाराष्ट्र), घोगला (दीव), मीरामार (गोवा), कासरकोड और पदुबिद्री (कर्नाटक), कप्पड (केरल), इडेन (पुदुचेरी), महाबलीपुरम (तमिलनाडु), रुशीकोन्डा (आंध्र प्रदेश), गोल्डेन (ओडिशा), और राधानगर (अंदमान - निकोबार द्वीप समूह) आदींचा समावेश करण्यात आला आहे.
काय आहे ब्लू-फ्लॅग प्रमाणपत्र?
आंतरराष्ट्रीय पातळीवर फाऊंडेशन फॉर एन्व्हायर्नमेंटल एजुकेशन या गैर सरकारी संस्थेद्वारे ह्या प्रमाणपत्राचे वितरण होते. १९८५ मध्ये या संस्थेची फ्रांस मध्ये स्थापन झाली. समुद्री तट क्षेत्रातील ३३ विविध माणकांचा गुणवत्तापूर्ण विकास साध्या करणाऱ्या ठिकाणांना या संस्थेतर्फे हे प्रमाणपत्र देण्यात येते. आजवर स्पेन या देशाला सर्वाधिक प्रमाणपत्र प्राप्त झाले आहेत.