अफगाणिस्तानात १०० दहशतवाद्यांचा खात्मा !

24 Dec 2019 18:17:30
अफगाणिस्तानमध्ये दहशतवाद्यांविरोधात जबरदस्त कारवाई करण्यात आली आहे. साधारणपणे अवघ्या २४ तासांत अफगाणिस्तानच्या सैनिकांनी १०० पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. जवानांकडून दहशतवाद्यांविरोधात राबवण्यात आलेल्या विविध अभियानात या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून अन्य ४५ दहशतवादी जखमी झाले आहेत. शिवाय, पाच दहशवतवाद्यांना अटक करण्यात देखील यश आले आहे. 
 

j_1  H x W: 0 x 
अफगाणिस्तानच्या सैन्याद्वारे १५ प्रांतामध्ये दहशतवाद्यांविरोधात १८ अभियान राबवण्यात आले होते. यासंदर्भात अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाद्वारे करण्यात आलेल्या ट्विटमध्ये सांगण्यात आले आहे की, मागील २४ तासांत अफगाणिस्तानमधील १५ प्रांतांमध्ये १८ अभियान राबवण्यात आले.
ज्यामध्ये तब्बल १०९ दहशतवाद्यांचा खात्मा झाला. तर अन्य ४५ दहशतवादी जखमी झाले आहेत. शिवाय, पाच दहशतवाद्यांना अटक करण्यात यश आले आहे. कारवाईत ठार करण्यात आलेले दहशतवादी हे एकाच दहशतवादी संघटनेचे होते की विविध संघटनांचे होते, याबाबत अद्यापपर्यंत अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाकडून अधिकृतपणे काही सांगण्यात आलेले नाही.
Powered By Sangraha 9.0