देशात मागील वर्षीपेक्षा यंदा साखर उत्पादन कमी

    दिनांक : 21-Dec-2019
पुणे: देशातील 406 साखर कारखाने 15 डिसेंबर अखेरीस सुरू झाले असून, यंदा 45.81 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. उत्तरप्रदेशने साखर उत्पादनात आघाडी घेतली आहे. एकूण उत्पादनापैकी जवळपास निम्मे उत्पादन उत्तरप्रदेशात झाले आहे. महाराष्ट्रात अवघे 7.66 लाख टन साखर उत्पादन झाले असून, मागील वर्षीच्या तुलनेत ते 30 टक्केच असल्याची माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने दिली आहे.

m_1  H x W: 0 x
 
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या साखर हंगामात 35 टक्के साखर उत्पादन कमी झाले आहे. गेल्यावर्षी याच काळात देशभरातील 473 साखर कारखान्यांची धुराडी पेटली होती. त्यातून 70.54 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. उत्तरप्रदेशातील 119 साखर कारखान्यांनी 21.25 लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. गेल्या वर्षी याच काळामध्ये येथील 116 कारखान्यांनी 18.94 लाख टन साखर उत्पादित केली होती. यावर्षी 2.31 लाख टन साखर अधिक उत्पादित केली आहे. देशात साखर उत्पादनात दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्रात 15 डिसेंबर अखेरीस 7.66 लाख टन साखर उत्पादित झाली. गेल्या वर्षी याच काळात राज्यातील 178 कारखाने सुरू होते. त्यांनी 29 लाख टन साखरेचे उत्पादन केले होते.