१९८७ पूर्वी जन्मलेले सर्व भारतीयच !

    दिनांक : 21-Dec-2019
नवी दिल्ली : देशात नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून रान पेटले असताना, 1987 च्या पूर्वी जन्मलेल्यांना भारतीय नागरिक समजले जाणार असल्याचे केंद्रातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे. तसेच, ज्यांचे आई-वडील 1987 पूर्वी भारतात जन्मले असल्यास त्यांना प्रामाणिक भारतीय नागरिक मानले जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने दिली. नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 वरून चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही. तसेच, देशात लागू होणाऱ्या नॅशनल रजिस्‍ट्रार ऑफ सिटिजन्सबद्दलही नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असेही ते म्हणाले.

a_1  H x W: 0 x 
 
नागरिकत्व कायद्यामध्ये 2004 ला संशोधन करण्यात आले होते. आसाम सोडल्यास इतर कोणत्याही राज्यात आई-वडिलांपैकी कोणतीही एक व्यक्ती भारतीय नागरिक आहे आणि ते अवैध निर्वासित नसल्यास त्यांच्या मुलांना भारतीय नागरिकत्व बहाल केले जाते. या कायद्यासंदर्भात समाज माध्यमांवर अनेक अफवा पसरवण्यात आल्या आहेत. ज्यांचे आई-वडील 1987पूर्वी देशात जन्मलेले आहेत, त्यांना भारतीय नागरिकच समजले जाणार आहे. आसाममध्ये ओळख आणि नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी आसाम करार 1971 करण्यात आला होता.