पोलिसाच्या वेशातील व्यक्ती संघ स्वयंसेवक नाही - दिल्ली पोलीस

    दिनांक : 18-Dec-2019
नवी दिल्ली : नवी दिल्लीतील जामिया मिलिया विद्यापीठात झालेल्या हिंसाचार प्रकरणानंतर सोशल मीडियात अफवांना ऊत आला असून अश्याच एका अफवेचा दिल्ली पोलिसांनी खोटारडेपणा समोर आणला आहे. दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील झालेल्या हिंसक आंदोलना दरम्यान लाल शर्ट व निळ्या रंगाची जीन्स घातलेला पोलिसाच्या वेशातील व्यक्ती संघाचा किंवा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा सदस्य नसून तो AATS पोलिसांच्या पथकातील पोलीस कर्मचारी असल्याचे दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

अ_1  H x W: 0 x
मागील दोन-तीन दिवसापासून सोशल मीडियात लाल टी शर्ट व निळ्या रंगाची जीन्स घातलेला युवक हा संघाचा स्वयंसेवक असून अभाविपचा पदाधिकारी असल्याचा दावा करण्यात येत होता. परंतु, सदर व्यक्ती पोलीस कर्मचारीच असल्याचं पोलीस अधिकारी डीसीपी रंधवा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. सदर व्यक्तीचे नाव भारत शर्मा असून तो संघाचा स्वयंसेवक असल्याचे फेसबुक प्रोफाईल चा स्क्रीन शॉट काढून लोकांना भ्रमित करण्यात येत होते.