निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींची पुनर्विचार याचिका फेटाळली

    दिनांक : 18-Dec-2019
नवी दिल्ली : निर्भया बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा आणि ऐतिहासिक निकाल दिला आहे. दोषी अक्षयची पुनर्विचार याचिका पहिल्याच दिवशी फेटाळली आहे. तीन आरोपींची पुनर्विचार याचिक याआधीच फेटाळण्यात आली होती. पटीयाला हाऊस न्यायालयात या दोषींना फाशी देण्यासंदर्भात याचिकेवर सुनावणी होणार आहे.

a_1  H x W: 0 x 
 
न्यायाधीष आर. भानुमती यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाकडे पुनर्विचार याचिकेवर सुनावणी होती. दोषी अक्षयच्या वकिलांनी बाजू मांडण्यासाठी ३० मिनिटांचा वेळ मागितला. याप्रकरणी सीबीआय तपास करण्याची मागणी होत होती पण सीबीआय तपास झाला नव्हता. पण रेयान इंटरनॅशनल केसमध्ये सीबीआय तपास झाला आणि बस कंडक्टरला सीबीआयने क्लीनचीट दिली.
निर्दोषांना याप्रकरणी गोवले गेले होते. पण सीबीआयमुळे सत्य समोर आले. म्हणून आम्ही याप्रकरणी सीबीआय तपासाची मागणी केल्याचे वकील एपी सिंह यांनी सांगितले. पण मुलीच्या मित्राने पैसे घेऊन माध्यमांमध्ये मुलाखत दिली. यामुळे केस प्रभावित झाल्याचे ते म्हणाले.
मेरठमधील पवन जल्लाद यांना दिल्लीतील तिहार जेलमध्ये बोलवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. फाशी देण्याआधी आरोपींची ट्रायल होणार असून त्यांचं वजन तपासलं जाणार आहे. त्यानंतर इतरही प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार असल्याचं पवन यांनी सांगितलं.