CAA च्या विरोधात 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा

    दिनांक : 18-Dec-2019
मंगळुरू: देशभरात काही शहरांमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध होत असताना आंदोलकांना व निदर्शने करणाऱ्या लोकांना आपण कश्यासाठी निदर्शने करत आहोत, हेच ठाऊक नसल्याचे अनेक माध्यमांनी समोर आणले आहेत. त्यामुळे देशात जो काही हिंसाचार पसरवला जातोय, त्यामागे कोणाचा हात आहे असा प्रश्न जनतेला पडत आहे. अश्यातच ट्विटर वर पोलिसांनी पकडलेले आंदोलक 'पाकिस्तान जिंदाबाद' च्या घोषणा देत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.
 
a_1  H x W: 0 x
 
कर्नाटक मधील मंगळूर शहरात पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरु केली असून काही आंदोलक 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा देताना दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शाह यांनी नागरिकत्व कायदा मुस्लिमविरोधी नसून या मुळे केवळ बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान मधून आलेले घुसखोर भारताचे नागरिक असणार नाहीत; या व्यतिरिक्त देशातील मुस्लिमांसह अन्य समाजाला घाबरण्याची गरज नाही असे स्पष्ट केले आहे. तरीही काही लोकांच्या व राजकीय सामाजिक नेत्यांच्या संभ्रम निर्माण करणाऱ्या भाषणातून होणाऱ्या अफवांना लोक बळी पडत आहेत. तथापि, नागरिकत्व कायद्याविरोधी सुरु झालेले आंदोलनात आता पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा दिल्या जात असेल तर ही निश्चीतच गंभीर बाब असून याविरोधात जनतेत संताप व्यक्त होताना दिसून येत आहे.