पोस्टाचे खातेधारक आहात? मग वाचा ही खुशखबर...

    दिनांक : 17-Dec-2019
नवी दिल्ली: बँकेप्रमाणे पोस्टामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठी आहे. पोस्टात पीपीएफ, सुकन्या समृद्धि आणि छोटया बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. पोस्ट विभागाने छोटया बचत योजनांमध्ये पैसे डिपॉझिट करण्याच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. नव्या नियमानुसार खातेधारक नॉन होम पोस्ट ऑफिस ब्रांचमध्येही २५ हजार पेक्षा जास्त रक्कमेचा चेक जमा करु शकतात.
 
 
a_1  H x W: 0 x
 
नॉन होम पोस्ट ऑफिस ब्रांच म्हणजे तुम्ही ज्या पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडले त्याऐवजी दुसऱ्या पोस्ट कार्यालयातुनही तुम्हाला तुमच्या खात्यात रक्कम भरता येईल. जुन्या नियमानुसार नॉन होम पोस्ट ऑफिस ब्रांचमध्ये २५ हजारापेक्षा जास्त रक्कमेचा चेक डिपॉझिट करण्याची परवानगी नव्हती.
 
दोन डिसेंबर २०१९ च्या आदेशानुसार, पोस्ट ऑफिस विभागाने आपल्या नियमात बदल केले आहेत. छोटया बचत योजनांमध्ये २५ हजारापेक्षा जास्त रक्कम चेकने जमा करता येत नाही अशा तक्रारी पोस्ट विभागाला मिळाल्या होत्या. त्यामुळे पोस्ट विभागाने नियमांमध्ये बदल केले आहेत. ज्याचा फायदा ग्राहकांना होईल.
 
आजही पोस्टातील गुंतवणूक सर्वात सुरक्षित समजली जाते. पोस्टात छोटया बचत योजनांवर मिळणारे व्याजही आकर्षक असते. पीपीएफ ७.९० टक्के, सुकन्या समृद्धि योजनेवर ८.४ टक्के, वरिष्ठ नागरीक बचत योजनेवर ८.६ टक्के, राष्ट्रीय बचत पत्रावर ७.९ टक्के, किसान विकास पत्रावर ७.६ टक्के व्याज मिळते.