...तर कॉंग्रेसने पाकिस्तानी नागरिकांना नागरिकत्व देण्याचं जाहीर करावं

17 Dec 2019 15:34:15
बरहैत: नरेंद्र मोदींनी झारखंडमधील बरहैत येथील सभेला संबोधित करताना, नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणाऱ्यावर निशाणा साधला. आर्टीकल 370 वेळेसही काँग्रेसने असाच गोंधळ घातला होता. आर्टीकल 370 काढले तर करंट बसेल, वातावरण चिघळेल, देश सहन करणार नाही, असा संभ्रम निर्माण केला होता. मात्र, तुम्हीच पाहिलं, 370 हटविल्यानंतर आता काश्मीरमध्ये शांतता आहे.
 
 
k_1  H x W: 0 x
 
काँग्रेस केवळ आपलं राजकारण करण्यासाठी या कायद्याला विरोध करत आहे. नागरिकता सुधारणा कायद्यावरुन काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष अफवा पसरवत आहेत, हिंसाचार घडवत आहेत. या कायद्यामुळे हिंदु-मुस्लीम-शिख-ईसाई, देशातील एकाही नागरिकाच्या नागरिकत्वास धोका होणार नाही, असे मोदींनी सांगितले. तसेच, मी काँग्रेस पक्षाला आव्हान देतो की, हिंमत असेल, पाकिस्तानच्या नागरिकांना नागरिकता देणार अशी घोषणा काँग्रेसने करावी, असे मोदींनी म्हटले.
 
 
 
गेल्या काही दिवसांपासून नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून मोठा वाद सुरू आहे. अनेक राज्यांनी हा कायदा लागू करण्यास मज्जाव केला आहे. महाराष्ट्राचीही या कायद्यासंदर्भात संदिग्ध भूमिका आहे. नॉर्थ इस्ट राज्यांमध्ये या कायद्याविरुद्ध मोठं आंदोलन पुकारण्यात आलंय. या आंदोलनाची धग देशभरात जाणवत असून हिंसाचाराच्या घटनाही घडल्या आहेत. यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेससह नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्यांना टोला लगावलाय. तसेच, काँग्रेसला आव्हानही दिलंय.
Powered By Sangraha 9.0