कांद्याची भाववाढ झाली; पण या शेतकऱ्याची झाली बक्कळ कमाई

    दिनांक : 17-Dec-2019
बंगळुरू: राज्यासह देशात कांद्याचे भाव वाढल्यामुळे अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत, पण याच कांद्याने एका कर्जबाजारी शेतकर्‍याला करोडपती बनवले आहे. मल्लिकार्जुन असे या शेतकर्‍याचे नाव असून, तो कर्नाटकमधील चित्रदुर्ग जिल्ह्यातील डोड्डासिद्वावनहल्ली येथील रहिवासी आहे. कांद्याच्या किमती वाढल्यानंतर मल्लिकार्जुन महिनाभरात करोडपती झाले. इतकेच नाही, तर परिसरातील शेतकर्‍यांसाठी ते एक आदर्श ठरले आहेत. आता लोक त्यांच्याकडे शेतीतील बारकावे समजून घेण्यासाठी येऊ लागले आहेत.


न_1  H x W: 0 x 
 
या शेतकऱ्याने कर्ज काढून कांद्याची शेती केली होती. कर्ज काढून मी सर्वात मोठा धोका पत्करला होता. जर माझे पीक वाया गेले असते, तर मी दुष्टचक्रातच फसलो असतो. मात्र, याच कांद्याने आता माझ्या कुटुंबाचे भाग्यच बदलले आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. एकूण २४० टन कांदा पिकवला. जेव्हा कांद्याची किंमत 200 रुपये प्रतिकिलो होती. तेव्हा त्यांना सहाजिकच मोठा फायदा झाला. तथापि, आपण १५ लाख रुपये गुंतवल्यामुळे आपल्याला जास्तीतजास्त पाच ते १० लाख रुपयांचा लाभ होईल, असे त्यांना वाटत होते. मात्र, कांद्याच्या किमती कितीतरी पटींनी वाढल्यामुळे त्यांना मोठा फायदा झाला. या फायद्यानंतर त्यांनी त्यांचे सर्व कर्ज फेडले आहे.