धुळे येथे हिंदुराष्ट्र जागृती सभेच्या प्रसाराचा झंझावात....!

17 Dec 2019 12:49:13
धुळे: येत्या २२ डिसेंबर २०१९ रोजी येथील गिंदोडीया मैदानात होणाऱ्या हिंदु राष्ट्र जागृती सभेचा प्रसार धुळे शहर आणि ग्रामीण परिसरात मोठ्या प्रमाणात सुरु असून, शहरातील मोक्याच्या जागी लावलेले होर्डिंग आणि फलक लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. सभेचे वैशिष्ट्य म्हणजे शहर आणि ग्रामीण क्षेत्रातील आबाल वृद्ध या सभेच्या प्रसारात सहभागी होत आहेत. शहरातील ऑटोरिक्शाच्या मागे पोस्टर चिकटवणे, मंदिरातून आरतीच्या वेळी तसेच प्रसारमाध्यमांद्वारे सभेचे निमंत्रण देणे आदी माध्यमातून प्रसार करण्यात येथील युवा वर्ग आघाडीवर आहे.

l_1  H x W: 0 x
 
आता पर्यंत सभेच्या प्रसारानिमित्त शहर आणि ग्रामीण भागात ७५ बैठका घेण्यात आलेल्या आहेत. तसेच whatsapp आणि फेसबुकच्या माध्यमातून सभेचा विषय १ लाखाहून अधिक लोकांपर्यंत पोहोचला आहे. यासोबतच कट्टा बैठका, घरोघर प्रसार होत असल्याने प्रत्येकाच्या तोंडी हिंदु जनजागृती समितीचा विषय चर्चिला जात आहे.
 
Powered By Sangraha 9.0