बांग्लादेशने मागवली अवैध वास्तव्य करणाऱ्या बांग्लादेशी नागरीकांची यादी

    दिनांक : 17-Dec-2019
ढाका: नागरिकत्व सुधारणा विधेयक भारताच्या संसदेत पारित झाल्यानंतर त्याचे पडसाद इतर राष्ट्रातही उमटू लागले आहेत. बांग्लादेशचे परराष्ट्र मंत्री ए. के अब्दुल मोमेन यांनी रविवारी भारताकडे आवाहन करत सांगितले की, तुमच्या देशात जे कोणी बांग्लादेशी अवैधरित्या वास्तव्य करत असेल त्यांची यादी आम्हाला द्यावी, त्या नागरिकांना पुन्हा आमच्या देशात सामावून घेण्यात येईल अशी मागणी बांग्लादेशने भारताकडे केली आहे.
 

l_1  H x W: 0 x 
राष्ट्रीय नागरिक रजिस्टरबाबत (एनआरसी) मोमेन यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना मोमेन म्हणाले की, बांग्लादेश आणि भारत यांचे संबंध खूप चांगले आहेत. या कायद्यामुळे आमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. काही व्यस्त कार्यक्रम आल्याने भारताचा दौरा रद्द करावा लागला होता. भारतात एनआरसी लागू करणे हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. काही भारतीय आर्थिक संकटामुळे बिचौलिएच्या माध्यमातून अवैधरित्या बांग्लादेशात घुसतात. मात्र आम्ही त्यांना पुन्हा भारतात पाठवतो असं त्यांनी सांगितले.
तसेच बांग्लादेशातून कोणी नागरिक अवैधरित्या भारतात घुसला असेल तर त्या लोकांची यादी आम्हाला द्या असं आम्ही नरेंद्र मोदी सरकारला कळविले आहे. आम्ही बांग्लादेशी नागरिकांना पुन्हा देशात परतण्याची परवानगी देऊ कारण त्यांना आमच्या देशात राहण्याचा अधिकार आहे, असेही बांग्लादेशचे परराष्ट्र मंत्री ए. के अब्दुल मोमेन यांनी सांगितले.