धक्कादायक: देशात ७० टक्के दुषित पाणी

    दिनांक : 10-Dec-2019
नवी दिल्ली : देशात पाणी समस्या असताना जे पाणी आहे तेही दुषित असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यसभेत दिलेल्या उत्तरात मंत्री कटारिया यांनी दिलेल्या माहितीत देशात ७० टक्के दुषित पाणी असल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे पाणी हा दिवसेंदिवस अधिक चिंतेचा विषय होत असताना दिसत आहे.

ब_1  H x W: 0 x 
 
पाणी दुषित होण्याची समस्या नवी नाही. देशात सांडपाण्याचे नियोजन तसेच कारखान्यातून येणारे रसायनयुक्त पाण्याचे नियोजन आजही योग्य पद्धतीने होत नाही. शिवाय कृषी वापरासाठी वापरण्यात येणारे पाणीही रासायनिक खतांमुळे दुषित होत आहे. देशभरात दिवसेंदिवस नद्या अधिक प्रदूषित होत आहे. सरकार यावर विविध उपाययोजना आणत असून त्यांची अंमलबजावणी केवळ सरकारी पातळीवर होत आहे, पण नागरिक अजूनही हा धोका समजू शकत नाही असे तज्ञ मत व्यक्त करतात. त्यामुळे दुषित पाणी हि समस्या दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे.

ब_1  H x W: 0 x 
 
समग्र जल व्यवस्थापन निर्देशांक हा नीती आयोगाने जुन 2018 मधे प्रकाशित केलेल्या अहवालात, भारताला आतापर्यंतच्या सर्वात कठीण अशा जल समस्येला तोंड द्यावे लागत असून, 600 दशलक्ष लोकांना मोठ्या पाणी समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे म्हटले आहे. जल दर्जा निर्देशांकात 122 देशांपैकी भारत 120व्या स्थानावर असून, भारतात 70 टक्के पाणी दूषित असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
केंद्रीय जल शक्ती आणि सामाजिक न्याय, सबलीकरण राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.