पोलार्ड आणि वानखेडेच जुनं नातं; होऊ शकतो हा धोका...

    दिनांक : 10-Dec-2019
मुंबई: वानखेडे स्टेडियम आणि पोलार्ड यांचे वेगळे नाते आहे. पोलार्ड हा मुंबई इंडियन्सचा खेळाडू आहे आणि येथील खेळपट्टीचा त्याला चांगला अभ्यास आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात पोलार्डचा हा अनुभव संघाच्या कामी येईल, असं मत विंडीज संघाचे प्रशिक्षक फिल सिमन्स यांनी व्यक्त केले. ते म्हणाले,''वानखेडे स्टेडियमवर पोलार्ड अनेक सामने खेळला आहे. त्यामुळे इंडियन प्रीमिअर लीगमुळे त्याच्या गाठीशी आलेला अनुभव उद्या संघाच्या कामी येणार आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला हिटमॅन रोहित शर्मानं विंडीज कर्णधार किरॉन पोलार्डचे कौतुक केले. त्यानं हे कौतुक करताना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला जणू पुढील धोक्याची जाण करून दिली.

ग_1  H x W: 0 x 
 
भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मानंही मुंबई इंडियन्सच्या सहकाऱ्याचे कौतुक केले. तो म्हणाला,'' मुंबई इंडियन्सच्या महत्त्वांच्या निर्णयांमध्ये पोलार्डचा सहभाग असतो. दुखापतीमुळे मला एका सामन्याला मुकावे लागले होते, तेव्हा त्यानं नेतृत्वाची धुरा सांभाळली होती. तो नक्की कसा विचार करतो हे मला माहित आहे. त्याला सामन्याची योग्य जाण असते. कोणत्या खेळाडूचा कसा उपयोग करून घ्यायचा, याचा चांगला अभ्यास आहे आणि मैदानावर त्याची कशी अंमलबजावणी करायची, हेही त्याला चांगले माहित आहे.''
 

ग_1  H x W: 0 x 
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातला तिसरा ट्वेंटी-20 सामना बुधवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. लेंडल सिमन्सच्या फटकेबाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजनं दुसरा सामना जिंकला आणि मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. या निकालामुळे तीन सामन्यांची मालिका जिंकण्याची दोन्ही संघांना समसमान संधी मिळाली आहे. त्यामुळे वानखेडेवर होणाऱ्या सामन्यात दोन्ही संघांकडून दमदार खेळ पाहायला मिळेल, हे निश्चित आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला हिटमॅन रोहित शर्मानं आम्ही कोणत्याच संघाला घाबरत नाही, असा दावा करताना उद्याच्या लढतीसाठी सज्ज असल्याचे सांगितले.