डॉक्टर प्रियांका रेड्डी अत्याचार प्रकरणी जागरूक मुस्लीम मंचतर्फे निषेध

30 Nov 2019 17:31:15
जळगाव: नोव्हेंबर अखेरीस देशाला काळिमा फासणारी घटना घडली. हैद्राबाद येथील डॉक्टर युवतीवर काही तरुणांनी मिळून अत्याचार करत नंतर तिला जाळून ठार केल्याची हि पाशवी घटना आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील जागरूक मुस्लिम मंच तर्फे तसेच शहरातील सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन माननीय मुख्यमंत्री तेलंगणा राज्य, तसेच माननीय अमित शहा केंद्रीय गृहमंत्री, भारत सरकार यांना प्रभारी जिल्हाधिकारी डॉक्टर बेडसे यांच्यामार्फत निवेदन देऊन या घटनेचा निषेध व्यक्त करत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची माग्निकेली आहे.

 
 
 
डॉक्टर प्रियंका रेड्डी यांच्यावर पाशवी अत्याचार करून तिच्या हत्याकांडास जबाबदार असणाऱ्या नराधमांना तात्काळ कठोर शासन करून घटनास्थळावर जाण्यासाठी दिरंगाई करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे. तसेच समाजात कायदा व सुव्यवस्थे बाबत समाजकंटकांना दहशत वाटावी व सर्वसामान्यांना विश्वास निर्माण व्हावा म्हणून सदर प्रकरण अतिजलद न्यायालयात निवाडा करून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी असेही त्यांनी निवेदनात म्हंटले आहे. देशभरातील महिलांमध्ये सुरक्षेतिची भावना निर्माण होण्यासाठी कठोर कायद्याची तरतूद करावी अशा विविध मागण्याही करण्यात आल्या आहेत.
मुस्लिम समाजाच्या वतीने सदर घटनेचा त्रीव शब्दात निषेध करण्यात आला. यावेळी कुल जमातीचे सय्यद चाँद व बशीर बुरहानी, मनियार बिरादरीचे फारुक शेख, ईदगाह ट्रस्टचे अनीस शाह व ताहेर शेख, काँग्रेस पक्षाचे अमजद खान, बाबा देशमुख व जमील शेख,मीज़ान फॉउंडेशन चे कासिम उमर, जामा मशीदचे अल्ताफ शेख व रउफ टेलर, फुले मार्केट हॉकर्स समितीचे फारुख अहेलेकार, शिरसोली शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य शेख अकील, आदींचा समावेश होता.
Powered By Sangraha 9.0