डॉक्टर तरुणीवर अत्याचार केला, नंतर जाळून मारले

    दिनांक : 30-Nov-2019
हैदराबाद: हैदराबादमध्ये एका वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून या तरुणीला जाळून मारण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला. जळालेल्या मृतदेहाचे फोटो पाहून संपूर्ण देश हादरला आहे. याप्रकरणी सायबराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबराबाद प्राथमिक तपासानुसार मुख्य सूत्रधार ट्रक चालक मोहम्मद पाशाला अटक केली त्यानंतर इतर तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मात्र या खळबळजनक घटनेनंतर संपूर्ण देशभरातून सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

 
 
 
आरोपींची चौकशी केली असता अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. पीडित तरुणीने आराडाओरडा केला असता तिचा आवाज कोणालाही ऐकायला जाऊ नये यासाठी आरोपींनी तिचे तोंड दाबून ठेवले होते. श्वास घेऊ न शकल्यामुळेच गुदमरुन पीडित तरुणीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रियंका रेड्डी हत्याप्रकरणी पोस्ट मार्टम अहवालातून धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, 4 जणांनी प्रियंकावर सामूहिक बलात्कार केला, त्यावेळी जवळपास 7 तास प्रियंकाला बांधून ठेवण्यात आले होते. बुधवारी रात्री 9.30 वाजल्यापासून गुरुवारी पहाटे 4 वाजेपर्यंत प्रियंकावर अत्याचार करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.