धुळ्यात भीषण अपघात, सात जणांचा मृत्यू

30 Nov 2019 17:20:26
धुळे: धुळ्यामध्ये पिकअप व्हॅनचा भीषण अपघात झाला आहे. मजुरांना घेऊन जाणारी पिकअप व्हॅन उस्मानाबादकडे जात असतांना ही घटना घडली. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

 
 
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे तालुक्यातील विंचूर शिवारातील बोरी नदीच्या पुलावरून मजूर घेऊन जाणारी पिकअप व्हॅन खाली नदीत कोसळली. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला. तर 20 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 2 महिला आणि 5 मुलांचा समावेश आहे. जखमींना तातडीने प्राथमिक उपचारासाठी धुळे शहरातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. मध्य प्रदेशातील मजूर उस्मानाबादकडे जाताना हा भीषण अपघात झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
Powered By Sangraha 9.0